जोतिबाच्या नावानं चांगभलं, यात्रेला सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माघ पौर्णिमेनंतर येणाऱया पहिल्या रविवारी श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या यंदाच्या खेटय़ांना रविवारी 8 फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला. कोल्हापूरसह महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर राज्यांतून हजारो भाविक पहाटेपासूनच पायी किंवा गाडीवरून डोंगरावर येऊन दर्शन घेत आहेत. श्रीक्षेत्र वाडी, तालुका – पन्हाळा येथील हे खेटे माघ महिन्यातील पाच रविवारी पार पडतात. डोंगर ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे. भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर प्रशासन सज्ज आहे.