
स्वतःच्या जन्मदात्या आईची अत्यंत निघृण हत्या करुन तिच्या काळजाचे तुकडे भाजुन खान्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधम मुलाला आज न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. रामा कुचकोरवी असे या नराधमाच्या नाव आहे. त्याला जिल्हा सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कावळा नका परिसरातील माकडवाला वसाहत येथे मयत यलव्वा कुचकोरवी ही मुलासह राहत होती. तिचा मुलगा सुनील कुचकोरवी हा व्यसनाधीन असल्याने तो वारंवार पैशासाठी आईशी भाडंण करत होता. 28 ऑक्टोबर 2017 रोजी आईकडे दारूसाठी पैशाची मागणी केली. पण आई पैसे देत नसल्याच्या रागातून घरातच त्याने धारदार शस्त्रांनी निर्दयपणे आईचा खून केला. निर्दयीपणाचा कळस म्हणजे त्याने आईच्या शरीरातील अवयव बाजूला काढून ते भाजुन खाण्याचा क्रूरपणा केला.
या घटनेची नोंद करुन, शाहूपुरी पोलिसांनी या गुन्हाचा तपास करत न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश महेश जाधव यांच्यासमोर सुरू होती. सरकारी वकील ॲड. विवेक शुक्ल यांनी 12 साक्षीदार तपासले. खुनाच्या गुन्ह्यात कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही परिस्थितिजन्य पुराव्यावरुन कोर्टाने आरोपीस दोषी ठरवले. सरकारी वकीलांनी केलेला युक्तीवाद,आरोपी विरुद्ध झालेल्या तक्रारी, हायकोर्टातील दाखल केलेले. तसेच सदर गुन्हा हा दुर्मिळातील दुर्मिळ स्वरुपाचा आहे. या गुन्ह्यात आईचा अनामुषपणे खून केलेला आहे. या सर्व बाबींचा विचार करुन जिल्हा व सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी भारतीय दंड विधान संहिता कलम 302 खाली दोषी ठरवून सुनिल कुचीकुरवी या नराधमाला मरेपर्यंत फाशी शिक्षा सुनावली. तसेच 25 हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला. या खटल्यात शाहूपुरी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय मोरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक एम.एम.नाईक, सुरेश परीट, लोहार यांचे सहकार्य लाभले.





























































