Kolkata Rape : पीडितेच्या शरीरावर चौदाहून अधिक जखमा, गुप्तांगात आढळला… पोस्टमॉर्टम अहवालातून धक्कादायक माहिती आली समोर

कोलकाता येथील आर जी कार वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि निर्घृण हत्येने संपूर्ण देश हादरला आहे. आता या प्रकरणातील आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडित डॉक्टरचे ऑटोस्पी रिपोर्ट समोर आले असून त्यात पीडितेच्या शरीरावर 14 जखमा असल्याचे म्हटले आहे.

काय आहे अहवालात?

– पीडितेच्या डोक्यावर, मानेवर, चेहऱ्यावर, हातावर व गुप्तांगावर 14 हून अधिक जखमा आहेत.

– पीडितेचा मृत्यू हा गळा घोटल्यामुळे गुदमरून झाला आहे.

– पीडितेवर लैंगिक अत्याचार झाले असून तिच्यासोबत बळजबरीने penetration करण्यात आल्याचे या अहवालात म्हटले आहे.

– पीडितेच्या गुप्तांगावर सफेद रंगाचा घट्ट चिकट द्रव पदार्थ आढळून आला आहे. तो द्रव पदार्थ पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आलाय.

– फुफ्फुसात व संपूर्ण शरीरात रक्ताच्या गुठळ्या झाल्या आहेत

– शरीरात कुठेही फ्रॅक्चर झालेले नाही

सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल

या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली असून देशभरात निदर्शने सुरूच आहेत. या पार्श्वभूमीवर आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली असून 20 ऑगस्ट रोजी या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे बी पार्डीवाला तसेच न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी पार पडणार असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

डॉक्टर, प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांवर संशय

तरुणीवर कामाचा प्रचंड दबाव होता असे पीडित डॉक्टरच्या आईने म्हटले आहे. त्यांनी पोलिसांना जबाब दिला असून मुलीवर बलात्कार आणि हत्येमागे रुग्णालयात काम करणारे काही डॉक्टर आणि प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी असू शकतात असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.