काँग्रेस -तृणमूल कार्यकर्त्यांत चकमक, रांगेत उभ्या मतदाराचा मृत्यू

सामना ऑनलाईन। कोलकाता

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. यावेळी मतदान करण्यासाठी रांगेत उभा असलेल्या एका नागरिकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना मुर्शिदाबादमधील बलिग्राममध्ये घडली.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱया टप्प्यासाठी मंगळवारी मतदान झाले. मतदानावेळी मुर्शिदाबादमध्ये टीएमसी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. तसेच गावठी बॉम्ब फेकल्याची घटना घडली. येथील राणीनगरमधील मतदान केंद्र क्रमांक 27 आणि 28 जवळ काही अज्ञात लोकांनी गावठी बॉम्ब फेकला. यात तृणमूल काँग्रेसचे तीन कार्यकर्ते जखमी झाले. या बॉम्ब स्फोटानंतर निवडणूक अधिकाऱयांनी मतदान केंद्र बंद केले आहे. यासंबंधीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये बॉम्ब फेकतानाचे दृष्य स्पष्ट दिसत आहे.