
मध्य रेल्वेने गणेशोत्सवानिमित्त होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस आणि कुडाळदरम्यान वातानुकूलित गणपती स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
ट्रेन क्र. 01269 ही विशेष ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 7, 8, 9 आणि 10 सप्टेंबर रोजी स. 04.35 वाजता सुटेल आणि कुडाळला त्याच दिवशी दु. 2.30 वाजता पोहोचेल.
ट्रेन क्र. 01270 ही परतीची ट्रेन कुडाळ येथून 7, 8, 9 आणि 10 सप्टेंबर रोजी दु.3.30 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे मध्यरात्री 3.00 वाजता पोहोचेल. थांबे : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग. डब्यांची रचना : 1 प्रथम वातानुकूलित, 4 द्वितीय वातानुकूलित, 13 तृतीय वातानुकूलित, आणि एक पॅण्ट्री कार. या ट्रेनचे आरक्षण विशेष शुल्कासह दि. 4 सप्टेंबरपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे.
































































