
सामना प्रतिनिधी। संगमेश्वर
संगमेश्वर येथे दोन विद्यार्थी बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. विश्वास उर्फ विशाल संजय गावडे आणि रुदीकेश रविकांत नाचरे अशी या दोघांची नावे आहेत. शनिवारी दुपारी हे दोघे खेळायला बाहेर जातो असे सांगून घराबाहेर पडले होते. मात्र उशीरापर्यंत घरी न आल्याने पालकांनी शोधाशोध सुरू केली. त्यावेळी ते बेपत्ता असल्याचे पालकांना समजले. दरम्यान याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
































































