कोपरगाव : अज्ञात आजाराने 6 गायी मृत्यमुखी पडल्या

प्रातिनिधीक फोटो

कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी व अंजनापुर या दोन गांवामध्ये अज्ञात आजाराने सहा गायी मृत्यमुखी पडल्या आहेत. गायी दगावल्याची घटना मंगळवारी (24) उघडकीस आली. दरम्यान या गायींचा व्हिसेरा पुढील तपासणीसाठी पुणे येथे रवाना करण्यात आला आहे.

धोडेंवाडी येथील आबासाहेब भडांगे यांच्या चार गायी दगावल्या तर अंजनापुर येथील संजय गोरक्षनाथ गव्हाणे यांची दोन गायी मृत्युमुखी पडल्या. या सर्व गाईंमध्ये विषबाधेच्या आजारात दिसणारी लक्षणे दिसत होती.

प्रथमदर्शनी ही नायट्रेट विषबाधा असल्याची शक्यता आहे. विषारी गवत खाल्याने ह्या गाया दगावल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकांनी व्यक्त केला आहे. कोपरगाव लघुचिकीत्सालयाचे सहाय्यक आयुक्त डॅा अजयनाथ थोरे,कोपरगांव प.स.चे पशुधन विकास अधिकारी डॉ दिलीप दहे व डॉ करण खर्डे, डॉ अशोक भोंडे आदिंनी मृत गाईचे शवविच्छेदन करुन नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविले. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच जनावरांचा मृत्यु कशामुळे झाला हे समजेल. अचानक गाई दगावण्यास सुरुवात झाल्याने पशुपालकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. इतर आजारी जनावरांवर पशुवैद्यकांनी उपचार करुन त्यांना वाचविण्यात यश मिळविले आहे.

गवत विषबाधेची शक्यता आहे. पशुपालकांनी जनावरांना गवत घालताना काळजी घ्यावी नेहमीच्या गवता पेक्षा वेगळे दिसणारे गवत बाजुला काढुन टाकावे. काठेमाठ व ढोलअंबा यासारखे विषारी गवत जानावराच्या चा-यात जाणारा नाही याची काळजी घ्यावी. सध्या गवत घालणे टाळले तर योग्य राहील. –
डॉ अजयनाथ थोरे ( सहाय्यक आयुक्त लघुचिकीत्सालय कोपरगाव)

या जनावरांना प्रथमदर्शनी अन्न विषबाधेची लक्षणे दिसत होती. मृत जानावरांचे शवविच्छेदन करुन नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.जानावरे आजारी पडण्याची लक्षणे दिसल्यास तातडीने पशुवैद्यकांशी संपर्क करावा. – डॉ दिलीप दहे (पशुधन विकास आधिकारी (विस्तार)

आपली प्रतिक्रिया द्या