
सामना प्रतिनिधी । कोपरगाव
हॉटेलचे भाडे मागण्यासाठी गेलेल्या मालकाचे बिअरच्या बाटलीने डोके फोडले आणि मारहाण केली.तसेच शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला असून हॉटेल मालक विजय नारायण वडांगळे यांनी कोपरगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव येथील स्टेशनरोडवर ‘हॉटेल व्हीआयपी’चे मालक विजय नारायण वडांगळे हे हॉटेलचेभाडे मागण्यासाठी गेले. परंतु भाडे मागितल्याचा राग येऊन राहुल रेरे, राजेंद्र पंजाबी याने बिअरची बाटली डोक्यात फोडून जबर जखमी केले. तर पवन डिंबरे याने डोक्यात काचेचा ग्लास फोडला. यांच्यासह इतर अनोळखी 5 ते 6 जणांनी शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून हॉटेलमधील खुर्च्या अंगावर फेकून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे विजय वडांगळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आरोपीवर 326, 143, 147, 148, 149, 324, 504, 506 प्रमाणे गुन्हा दखल करण्यात आला आहे.
































































