
प्रचंड रोजगार निर्माण होणारा रिक्षा टॅक्सी व्यवसाय गेल्या दोन महिन्यांपासून बंद असल्याने प्रचंड अडचणीत आला आहे. त्यामुळे सरकारने रिक्षा – टॅक्सी वाहतूक उद्योगाला सरकारने तातडीने आर्थिक पॅकेज जाहीर करावे अशी मागणी कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा – टॅक्सी संघटनेच्या वतीने योजना शिवसेना उत्तर नगर जिल्हा प्रमुख तथा संस्थापक राजेंद्र झावरे उपजिल्हाप्रमुख तथा संघटनेचे अध्यक्ष कैलास जाधव, पत्रकार तथा उपाध्यक्ष राजेंद्र सालकर यांनी केली आहे.
कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या अनेक उद्योगांना सरकारकडून कोट्यवधी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात येत आहेत. दारु दुकानासह अनेक व्यवसाय खुले करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा असतानाही रिक्षा-टॅक्सी वाहतूक व्यवसाय बंद ठेवण्यात आला आहे. अजूनही किती दिवस बंद राहील याची शाश्वती नाही. त्यामुळे प्रचंड अडचणीत असलेल्या रिक्षा टॅक्सी व्यवसायाला सरकारने कोणतीच मदत जाहीर केली नाही. परदेशात देखील पब्लिक वाहतूक व्यवसायाला त्या त्या सरकारने मदत केली आहे. सरकारने रिक्षा टॅक्सी व्यवसायाला मदत केली नाही तर 25% वाहने कायस्वरूपी बंद होतील आणि 25 ते 35 टक्के बेरोजगारी वाढेल.
या व्यवसायात मोठ्या प्रमाणात सुशिक्षित तरुणांचा समावेश आहे. त्यामुळे रिक्षा व टॅक्सी व्यवसाय वाचवण्यासाठी सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर करावे या मागणीचा सरकारने गांभीर्याने विचार केला नाही, तर प्रसंगी न्यायालयातही जावे लागेल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. चौकट मुख्यमंत्री सहायता निधीतून, रिक्षावाल्यांना प्रत्येकी दहा हजार द्या, अशी मागणी यापूर्वीच 30 एप्रिल रोजी संघटनेने निवेदनाद्वारे सरकारकडे केली केली होती. निवेदन मुख्यमंत्री, परिवहन मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना दिले होते अद्यापही सरकार कडून कुठल्याही प्रकारचे उत्तर प्राप्त झालेले नाही.



























































