
लाॅकडाऊनमुळे सर्वच ठप्प झाले होते. वसतिगृहात राहून अभ्यास आणि ऑनलाईन पेपर सोडवत होतो. सर्वच बंद असल्यामुळे मेसला कित्येक दिवस एकच भाजी असायची. कधी घरी पोहोचू, असे सारखे वाटायचे. आज घरी परतल्याचा आनंद असला तरी शिक्षण बुडत असल्याची भावना राजस्थानातील कोटा येथे शिक्षणासाठी गेलेल्या, परंतू लाॅकडाऊनमुळे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांनी पुण्यात परतल्यानंतर व्यक्त केली.
कोटा (राजस्थान) येथे शिक्षणासाठी गेलेल्या परंतु, लॉकडाउनमुळे अडकून पडलेले पुण्यातील ७२ विद्यार्थी शुक्रवारी रात्री घरी परतले. स्वारगेट येथे आल्यानंतर विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.@advanilparab @Saamanaonline #FightAgainstCoronavirus pic.twitter.com/a0pDL9F7fu
— Ganesh rakh (@GNRSpeaks) May 2, 2020
कोटा (राजस्थान) येथे लॉकडाउनमुळे अडकून पडलेल्या राज्यातील 1 हजार 764 विद्यार्थ्यांना घरी जाण्याची ओढ लागली होती. यासाठी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांना सोशल मीडियाद्वारे आवाहन केले होते. त्यानुसार प्रशासनाने या विद्यार्थ्यांना घरी परत आणण्यासाठी पुढाकार घेतला होता. राज्य शासनाने एसटी महामंडळाच्या मदतीने या विद्यार्थ्यांना परत आणण्याची सोय केली. यासाठी धुळे आगारातून 72 बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. राज्यातील विविध जिल्ह्यातील एकूण 1 हजार 764 विद्यार्थ्यांपैकी 97 विद्यार्थी हे पुणे जिल्ह्यातील आहेत. गुरुवारी या बसेसचा परतीच्या दिशेने प्रवास सुरू झाला. त्यानंतर शुक्रवारी रात्री जिल्ह्यातील 72 विद्यार्थी स्वारगेट बस स्थानकावर पोहोचले. दरम्यान, बस स्थानकावर पालकांची गर्दी होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात आली होती. बसस्थानकातून विद्यार्थी बाहेर पडताना त्यांना स्वारगेट पोलीस स्टेशनच्या वतीने जेवण, नाश्ता, पाणी देण्यात आले.
#कोरोना कोटा (राजस्थान)येथून विद्यार्थी एसटीने स्वारगेट बसस्थानक, पुणे येथे आज पहाटे 12:30 वाजता (शेवटची चौथी बस) पोहोचली. 74 विद्यार्थी आणि 08 ड्रायव्हर यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. COVID -19 लक्षणे अथवा आजारी म्हणून कोणीही नाहीत.@MahaDGIPR @mhaisekar1 @collectorpune1
— DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@InfoDivPune) May 2, 2020
मुलगी परतल्याने आनंद
आठ ते नऊ महिन्यांपासून माझी मुलगी क्लासेस साठी राजस्थानात कोटा येथे गेली होती. लॉकडाउन काळात सर्वच बंद असल्यामुळे मुलीची काळजी वाटत होती. मुलीला रोज रात्री फोन करीत होतो. मात्र, सर्वच बंद असल्यामुळे मुलीला परत आणता येत नव्हते. आज मुलगी सुखरूप परतल्यामुळे खूप आनंद झाला आहे. – श्रीकांत देवकर (पालक), इंदापूर

लॉकडाऊन मुळे अडकून पडले होते. आज खूप दिवसांनी घरी चालली आहे. त्यामुळे खूप आनंद वाटत आहे. मात्र शिक्षण बंद झाल्यामुळे वाईटही वाटत आहे, अशी भावना कोटा येथे ‘नीट’च्या क्लासेससाठी गेलेली आणि मूळ इंदापूरची असलेली विद्यार्थिनी ऋतुजा देवकर हिने व्यक्त केली.

दोन वर्षापासून मेडिकल शिक्षणासाठी कोटा येथे आहे. लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर सर्वच बंद झाले. घरी येण्याची खूप इच्छा होती. मात्र, घरी परतण्यासाठी कोणताही पर्याय नव्हता. आज घरी पडल्यामुळे आनंद होत असल्याची भावना पिंपळे गुरव येथील हर्ष परमार याने व्यक्त केली.
पुणे: महाराष्ट्र की 74 बसें कल रात राजस्थान के कोटा में फंसे छात्रों को वापस लेकर आईं। स्वार गेट बस अड्डे पर सभी छात्रों के स्वास्थ्य की जांच की गई। छात्रों को होम-क्वारंटाइन रहने की सलाह दी गई है। #Maharashtra pic.twitter.com/gHDR1ec1Oi
— ANI_HindiNews (@AHindinews) May 2, 2020
कोटा येथून विद्यार्थ्यांना राज्यात घेऊन येणाऱ्या बसेचसे निर्जंतुकीकरण करण्यात आलेले आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे देखील सर्व नियम पाळण्यात आले आहेत, अशी माहीती परिवहन मंत्री अनिल परब यांनी व्टिटव्दारे दिली.



























































