
कृष्णा नागेश पाटील-आष्टीकर यांची पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
नाशिक लोकसभा संपर्कसंघटक पदी रिता वाघ
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नाशिक लोकसभा क्षेत्राकरिता महिला संपर्कसंघटक पदी रिता वाघ यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.




























































