#फायद्याचंबोला! गॅस, मुळव्याध, पित्तावर रानभाजी ‘कुडा’ गुणकारी; बिया आणि साली अधिक उपयोगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
kuda-thumb

>> अभिषेक भटपल्लीवार, चंद्रपूर

रानभाजी कुडा (Konesi Bark Tree)

पावसाळ्यात बाजारात रानाभाज्या उपलब्ध होतात. आरोग्यदायक अशा ‘कुडा’ भाजीची माहिती घेऊ.

कुडा ही भाजी कुठल्या भागात आढळते?

बल्लारपूर, वरोरा, भद्रावती, चिमूर, जिवती.

कुडा भाजीचे साहित्य


View this post on Instagram

A post shared by Saamana (@saamanaonline)

कुडा फुले, तेल, बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुण, जिरं, तिखट, मीठ, हळद, टोमॅटो, कोथींबीर

कुडाच्या फुलाची भाजी

एक पातेले घेऊन त्यात एक ग्लास पाणी व कुडाची फुले उकळून घ्यावे. नंतर त्यातील पाणी नितळून घ्यावे.

एक पातेले घेऊन त्यात आपल्याला पाहिजे तेवढे तेल, गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुण, जिरं, तिखट, मीठ, हळद तळून घ्यावे.

त्यामध्ये उकळलेली कुडाची फुले टाकून शिजू द्यावी. नंतर कोथींबीर टाका. भाजी तयार.

औषधी गुणधर्म

अनेक औषधात कुडाची मुळाची सालं आणि बिया वापरतात.

कुष्ठरोग, त्वचारोग यात गुणकारी. धावरे, रक्तस्रावयुक्त मुळव्याध, थकवा, यामध्ये कुडाच्या बिया उपयुक्त आहेत.

बियांचे चूर्ण चिमूटभर रोज खाल्यास अन्न जिरते, पोटात वायु (गॅस) धरत नाही.

अतिसार, ताप, काविळ, कुष्ठरोग, कफ, त्वचा विकार, पित्तकोष यात याचे साल गुणकारी आहे.