युवा बांगलादेश संघाचा खुर्दा, कुमार विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडचा दणदणीत विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयसीसी 19 वर्षांखालील अर्थात कुमार विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या ‘अ’ गटातील सलामीच्या लढतीत युवा बांगलादेश संघाचा युवा इंग्लंडपुढे 97 धावांत खुर्दा उडाला. यात तळाचा फलंदाज रिपोन मोंडोलने नाबाद 33 धावांची खेळी केली. इंग्लंडने हे माफक आव्हान 25.1 षटकांत 3 बाद 98 धावा करून आरामात पूर्ण केले.

युवा बांगलादेशचा कर्णधार राकिबुल हसनने नाणेफेकीचा कौल जिंकून घेतलेला फलंदाजीचा निर्णय चांगलाच अंगलट आला. तळाचा रिपोन मोंडोलने 41 चेंडूंत 3 चौकार व एका षटकारासह सर्वाधिक 33 धावांची खेळी केली म्हणून बांगलादेशला 35.2 षटकांत 97 धावसंख्येपर्यंत मजल मारता आली.

इंग्लंडचा 26व्या षटकात विजय
इंग्लंडच्या युवा संघाने मिळालेले 98 धावांचे लक्ष्य 25.1 षटकांत 3 फलंदाजांच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. जॉर्ज थॉमस (15), जॅकोब बेथेल (44) व जेम्स रेव्ह (नाबाद 26) यांनी या विजयात योगदान दिले. कर्णधार टॉम प्रेस्ट 4 धावांवरच बाद झाला. बांगलादेशकडून रकीबुल हसन व रिपोन मोंडोल यांनी 1-1 बळी मिळविला.