हरिद्वारमध्ये 175 साधु, संतांना कोरोनाची लागण; संक्रमित साधुंची संख्या 229 वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हरिद्वारमध्ये कुंभमेळा अजून सुरू आहे. या कुंभमेळ्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शनिवारी  175 साधुंना कोरोनाची लागण झाले आहे. त्यामुळे आतापर्यंत 229 साधुंना कोरोनाची लागण झाली आहे.

मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एस के झा यांनी मेडिकल बुलेटिन जारी करून ही माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून अनेक साधु संत दहशततीच्या छायेखाली आहेत. जुना आखाड्याने कुंभ समाप्तीची घोषणा केली आहे.

हरिद्वारमधील कुंभमेळ्यात हजारो भाविकांनी सहभागी झाले होते. तसेच हजारो साधु संतांनी या कुंभमेळ्यात हजेरी लावली होती. तेव्हा मोठ्य प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. शनिवारी 175 साधुंना कोरोनाची लागण झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे कोरोना लागण झालेल्या साधुंची संख्या 229 वर पोहोचली आहे. निरंजनी आखाड्याने 15 दिवसांपूर्वी कुंभमेळा संपल्याचे जाहीर केले होते. त्यापाठोपाठ जुना आखाड्यानेही कुंभमेळा संपल्याची घोषणा केली.

हरिद्वार कुंभमेळ्यात 10 ते 14 एप्रिल दरम्यान 1700 हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार कुंभमेळ्यात 2 लाख 36 हजार 751 कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या, त्यापैकी 1 हजार 701  जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.