ऑटिस्टिक मुलांच्या प्रश्नावर कुंडलीतून मिळतो उपाय!

260

anupriya-desai-astrologer>>अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तु विशारद)

ऑटिस्टिक किंवा ज्याला आपण म्हणतो “स्वमग्नता”. हल्लीच्या मुलांमध्ये हा दोष दिसून येऊ लागला आहे. भारतामध्ये १०० मुलांपैकी १ मुल हे ऑटिस्टिक (स्वमग्नता) आहे. मतिमंदत्त्व आणि स्वमग्नता ह्यांत फरक आहे. मुल मतिमंद आहे हे जेवढ्या पटकन लक्षात येतं तेवढं आपलं मुल ऑटिस्टिक आहे हे लक्षात येण्यास खूप वेळ जातो. काही वेळेस मुल १२-१३ वर्षांचे झाल्यावरसुद्धा ही गोष्ट लक्षात येते. भारतामध्ये गरोदरपणी ज्या चाचण्या केल्या जातात त्या चाचण्यांमध्ये मुलांमधील दोष कळून येतो. ह्या चाचण्यांमध्ये गर्भातल्या बाळाची शारीरिक आणि मानसिक वाढ व्यवस्थित होत आहे की नाही ह्या दोन्ही गोष्टींवर भर दिला जातो. बाळ मतिमंद आहे हे ह्या चाचण्यांमध्ये लक्षात येतं परंतु मुल ऑटिस्टिक आहे हे गर्भचाचणीत लक्षात येत नाही. मुल २-३ वर्षांचं झाल्यावर ही गोष्ट लक्षात येते. ह्याची लक्षणं जी असतात ती खालीलप्रमाणे –

१) स्वतःमध्येच मग्न असणे. (म्हणूनच ह्याला मराठीत “स्वमग्नता” असं संबोधलं जातं.)

२) संवादासाठी बोट दाखवणे,खाणाखुणा करणे.

३) भाषेचा विकास विलंबाने अथवा अजिबात न होणे.

४) तोंडातून सतत एकाच प्रकारचा आवाज करीत राहणे.

५) परिस्थितीत बदल झाल्यास अस्वस्थ होणे.

६) समोरच्या व्यक्तिकडे न बघणे,नजरेला नजर न देणे.

७) परिचित व्यक्तिने मिठी मारल्यास अथवा जवळ घेतल्यास विरोध दर्शविणे.

८) मैत्री करता न येणे.

ऑटिस्टिक मुले आपल्या कुटुंबातील व्यक्ति सोडल्यास बाकी कोणाबरोबरही संवाद साधत नाहीत. कौटुंबिक सोहळ्यात अशी मुले बिथरून जातात.

गेल्या काही महिन्यांत माझ्याकडे आलेल्या केसेसमध्ये ऑटिस्टिक मुलांच्या कुंडल्या अभ्यासासाठी मिळाल्या. पालकांना आपले मुल आणि त्याचे पुढचे भविष्य ह्याची चिंता असते. ह्या मुलांचा अभ्यास,करिअर,आयुष्य,आरोग्य ह्या गोष्टींवर मग चर्चा होते. कुंडलीत असे काय योग असतात ज्यामुळे मुल ऑटिस्टिक आहे हे लक्षात येते? अभ्यास केल्यानंतर खालील मुद्दे मिळाले –

१) मुल स्वमग्न असल्याने – स्वमग्नतेसाठी कुंडलीतील शनिची स्थिती तपासाली. कुंडलीत लग्न स्थानाशी निगडीत शनि असल्यास मुल ऑटिस्टिक असते. शनिची वृत्ती ही “संकुचित” करण्याची आहे. लग्नातील शनिची सप्तम स्थानावर सप्तम दृष्टी असते. सप्तम स्थान हे आपण आपल्या Social Life शी निगडीत असलेले स्थान. आपण समाजात कसे वावरतो हे ह्या स्थानावरून समजते. लग्नातील शनि सप्तम स्थानाला पाहत असल्याने व्यक्तिचे Social Life संकुचित असते. तो आपल्या फक्त कुटुंबियांबरोबरच समरस होतो. कुटुंबाव्यतिरिक्त असलेल्या व्यक्तिंबरोबर स्वतःहून बोलणे, समारंभात सहभाग जवळजवळ नसतोच.

२) संवाद साधू शकत नसल्याने/भाषेचा विकास विलंबाने – बुध हा ग्रह “Communication” चा कारक आहे. ही मुल संवाद साधू शकत नसल्याने कुंडलीत बुधाची स्थिती फारशी चांगली आढळली नाही. बुध अस्त असून शनिच्या युतीत किंवा स्वतःच्या बुधाच्याच नक्षत्रात,बुध राहूच्या युतीत असणे हे आढळले. बुध हा वाचेचा कारक असल्याने ज्याच्या कुंडलीत बुधाची स्थिती चांगली असते तो मातीसुद्धा सोन्याच्या भावाने विकू शकतो. बुध शनिच्या नक्षत्रात असणे म्हणजे संवाद खुंटीत होणे. बुध राहुबरोबर युतीत म्हणजेच संवाद तर आहेत परंतु उच्चार शुध्द नसणे. ह्या मुलांना इतर मुलांपेक्षा भाषा शिकण्यास वेळ लागतो.

बुध हा बुद्धीचा सुद्धा कारक ग्रह आहे. बुध म्हणजे बुद्धी. ‘कुंडलीत चांगल्या स्थितीतील बुध व्यक्तिचा “Common Sense” कसा आहे हे दर्शवतो. बुध ग्रह आहे ज्यासी नीट,तत्यासी सर्व मार्ग सुचते सुभट’ ह्या उक्तीवरुन बुधाचे महत्त्व लक्षात येईल. बुद्धी स्थिर असणे,प्रगल्भ असणे ह्यासाठी बुधाची कुंडलीतील स्थिती चांगली असणे महत्त्वाचे. ह्या मुलांच्या कुंडलीत बुध ग्रहाबरोबर इतर ग्रहांचे होणारे योग किंवा बुधला पूरक स्थिती न मिळाल्यामुळे मेंदूच्या विकासासाठी त्यांना प्रशिक्षण घ्यावे लागते.

३) लग्न स्थान म्हणजे तुम्ही स्वतः. तुमची संपूर्ण Personality ह्या लग्न स्थानावरून लक्षात येते. त्यामुळे लग्न स्थानात असलेले ग्रह किंवा लग्न स्थानाचा स्वामी ग्रह ह्याची कुंडलीतील स्थिती चांगली असावी. ऑटिस्टिक मुलांच्या कुंडलीत लग्नेश हा अस्त, केतूबरोबर युतीत किंवा लग्नेश स्वतः वक्री आढळला.(अर्थात इतर ग्रहयोगही पूरक असल्यास )

४) द्वितीय स्थान -वाचा स्थान. लग्न स्थानावरून जशी तुमच्या Personality ची कल्पना येते तशीच तुमचे Communication कसे आहे ह्याचा अभ्यास कुंडलीतील द्वितीय स्थानावरून करता येतो. द्वितीय स्थानातील सुस्थितीतील ग्रह,द्वितीयेश (द्वितीय स्थानाचा स्वामी ) चांगल्या स्थितीत असणे हे व्यक्ति गायक,उत्तम speaker,मार्केटिंग एक्स्पर्ट असल्याचे दर्शवतात. परंतु द्वितीय स्थानाशी असणारा शनि,राहू,केतू ह्या ग्रहांचा संबंध,द्वितियेश हा राहू,केतू किंवा शनिच्या नक्षत्रात आढळला.

४) मुलाला जन्मतः राहू,चंद्र किंवा बुधाची महादशा असते आणि राहू,बुध,चंद्र ह्यांची स्थिती वर सांगितल्याप्रमाणे असेल तर अशा दशा मुल autistic असल्याचे confirm करतात.

६) गुरु हा ग्रह व्यक्तिच्या शिक्षणाबाबत माहिती देतो. गुरुची कुंडलीतील स्थिती म्हणजे गुरु राहुबरोबर युतीत असणे किंवा राहुच्या नक्षत्रात असणे,गुरु वक्री असणे,गुरु अस्त असणे,गुरु केतू बरोबर युतीत असणे. गुरु अशा ग्रहांच्या युतीत असणे किंवा नक्षत्रात असतांना मुलांच्या शिक्षणात अडथळे दर्शवतात. कुंडलीत इतर ग्रहयोग पूरक असले तर शिक्षण पूर्ण होते परंतु अडथळ्यांची शर्यत पार करत.

एका केसमध्ये वर सांगितल्याप्रमाणे ग्रहस्थिती होतीच त्याच बरोबर गुरु ह्या ग्रह उच्चीचा आहे. आपले मुल ऑटिस्टिक आहे हे त्याच्या पालकांच्या खूप उशीरा म्हणजेच त्याच्या वयाच्या १२व्या वर्षी लक्षात आले. त्यानंतरही खचून न जाता त्याच्या पालकांनी त्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्यास सुरवात केली. त्याचे फळ म्हणून ह्या मुलाला दहावीत ७३% मिळाले. पुढे सायन्स ह्या शाखेचे शिक्षण घेऊन संगीत क्षेत्रात नाव कमवण्याची मुलाची इच्छा आहे. लहानपणापासूनच हार्मोनिअमचे धडे घेत आहे. कुंडलीत चंद्र वृषभेचा,बुध कन्येचा (चंद्राच्या नक्षत्रात),शुक्र तूळेचा(चित्रा नक्षत्रात ),गुरु द्वितीयेश आणि कर्क राशीत(पुष्य नक्षत्रात). संगीत क्षेत्रात नक्कीच प्रसिद्धी मिळवणार ह्यांत शंका नाही.

माझ्याकडे आलेल्या केसेसमध्ये मला काही साम्य आढळले. ग्रह स्थितीत साधर्म्य आढळून आले. त्या तुमच्यासमोर कुंडलीच्या भाषेत मांडण्याचा हा प्रयत्न. ऑटिस्टिक असूनही ह्या मुलांमध्ये काही विशेष गुण आहेत ते ओळखण्याची सुज्ञ दृष्टी असावी. ह्या गुणांना ओळखून ह्या निरागस फुलांना उमलू देण्याची संधी उपलब्ध करून द्यावी.

कसा वाटला हा लेख? प्रतिक्रिया जरूर कळवा – [email protected]

संपर्कसाठी मोबाईल क्रमांक- ९८१९०२१११९ (फक्त संध्याकाळी ६ ते ८ यावेळातच फोन करणे)

summary: kundli is effective in autistic child case

आपली प्रतिक्रिया द्या