कुणकेश्वराच्या यात्रेसाठी देवस्थान सज्ज

221

श्री क्षेत्र कुणकेश्वर ची यात्रा दिनांक 21 फेब्रुवारी 2020 ते 23 फेब्रुवारी 2020 मोठ्या दिमाखात संपन्न होणार आहे. यात्रा नियोजन त्यादृष्टीने देवस्थान ट्रस्ट कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. यात भव्य मंडप व्यवस्था, अखंडित विद्युत व्यवस्था, आपत्कालीन परिस्थितीमध्ये जाण्यासाठी पर्यायी रस्त्यांची व्यवस्था, तसेच मंदिरात गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी बेरीकेटिंग व मजबूत रेलींग करण्यात आले आहे. या कामी स्वतंत्र स्वयंसेवकांचे योग्यप्रकारे नियोजन करण्यात आले आहे.

यात्रेच्या वेळी गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या करणे महिलांची छेडछाड करणे. अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी देवस्थान ट्रस्ट करून मंदिर व मंदिर परिसर यात्रा परिसरात आवश्यक त्या ठिकाणी क्लोज सर्किट कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या वर्षी त्यात जम्बो कॅमेऱ्यांचा समावेश आहे. तसेच देखरेखीसाठी स्वयंसेवकांचे भरारी पथक आणि समुद्रकिनारी सागरी सुरक्षा दल असणार आहे. त्याचप्रमाणे देवगड महाविद्यालयाच्या वतीने प्रशासकीय यंत्रणांना तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागात मदतीस शंभर विद्यार्थी स्वयंसेवक असणार आहेत. सदर विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव प्रथम उपचार बिनतारी संदेश यंत्रणा पाण्यातील व्यक्ती बचाव पद्धती अशा अनेक बचाव पद्धतीने प्रशिक्षण तज्ञ प्रशिक्षकांमार्फत देण्यात आलेले आहे. क्षेत्र कुणकेश्वर मंदिर मागील ठिकाणी असणाऱ्या व भक्तनिवास शेजारील रस्त्यांचे डांबरीकरण होण्यासाठी मागणी केलेला आहे. त्याचप्रमाणे विद्युत व्यवस्थापनाच्या दृष्टीने संबंधित खात्याने आवश्यकते कामकाज याचे पूर्वी करण्याचे दृष्टीने कार्यवाही चालू आहे. श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे साठी दर्शना साठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा प्रमाणात दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत आहे. यावर्षी अमावस्या रविवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी असल्याने तीर्थस्थानास भाविकांना व देवभेटी करिता येणाऱ्या देवस्वाऱ्यांना संपूर्ण दिवस लाभ घेता येणार आहे.

समुद्रकिनारी किनाऱ्यावरील भागांमध्ये हे सर्व ठिकाणी विद्युत व्यवस्था पुरुष व महिलांकरिता ठीक ठिकाणी कपडे बदलण्यासाठी व्यवस्था असणार आहे. त्याचप्रमाणे पोलीस व कुणकेश्वर ग्रामस्थांकडून भाविकांसाठी समुद्रकिनारी सुरक्षा पथके असणार आहेत .यात्रा परिसरामध्ये राजकीय बॅनर व बॅनर्स यापासून असुरक्षितता निर्माण होऊ नये यासाठीचे नियोजन देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत कुणकेश्वर यांचेकडून करण्यात आले आहे. रस्त्यावरती बॅनरच्या कमानी बांधण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याच भावाने पूजा ताट विक्रेते व व्यापाऱ्यांना प्लास्टिक पिशवी विक्री व वापर करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. प्रांत अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कुणकेश्वर येथे ग्रामस्थ, कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट, आणि ग्रामपंचायत कुणकेश्वर यात्रा नियोजन बैठक पार पडली. त्यात प्रत्यक्षात कामकाजाची पाहणी करून उणिवा समजून घेण्यात आल्या त्याचप्रमाणे संबंधित शासकीय खात्याला अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने सूचना देण्यात आल्या. यात वाहतूक व्यवस्था रस्ते विद्युत व्यवस्था आरोग्यव्यवस्था पोलिस बंदोबस्त सुरक्षाव्यवस्था स्वयंसेवक पाणीपुरवठा या सर्व मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला. परंतु प्रस्तावित कामांपैकी रस्त्यांची कामे पूर्ण झाली नाहीत.

कुणकेश्वर मंदिराच्या मागून जाणारा रस्ता व त्याला त्यासाठी सुमारे पाच लाखाचा निधी मंजूर असून अजून रस्त्याचे काम चालू झाले नाही. त्यामुळे यात्रेकरूंना फार त्रास होणार आहे. तसेच मिठबाव ते कुणकेश्वर येथे रस्त्यालगतची झाडी तोडलेली नाही मुंबई समुद्र किनारी अस्मि हॉटेल येथे बॅरिकेट्स नाहीत. त्यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पूर्ण प्राथमिक शाळा कुणकेश्वर कातवण येते बॅरिकेट्स लावण्यात आलेले नाहीत.सदर कामांबाबत दरवर्षी या यात्रा नियोजन सभेत निर्माण केली जातात. परंतु शासनाकडून वारंवार दुर्लक्ष केल्या जात असल्यामुळे कुणकेश्वर ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.याबाबत मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने लक्ष द्यावा. यात्रौत्सव अवघ्या चार दिवसांवर आला असून अजून शासन व प्रशासनाचा याठिकाणी दुर्लक्ष झाल्याचा दिसून येत आहे .श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रेचे थेट प्रक्षेपण संपूर्ण जिल्ह्यात तसेच संपूर्ण महाराष्ट्रात देशभरात होणार आहे. संपूर्ण यात्रा परिसरामध्ये एल .इ.डी स्क्रीनद्वारे प्रक्षेपण आहे. दिवसेंदिवस भाविक भक्तांचा वाढता ओघ पाहता देवस्थानच्या वतीने नियोजनात बदल करून व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे .

यावर्षी कुणकेश्वर भेटीकरिता व तीर्थस्थान यासाठी येणाऱ्या असणाऱ्या देव स्वरांच्या कमिटीने नियोजनाच्या दृष्टीने देवस्थान ट्रस्टशी लवकरात लवकर प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे ट्रस्ट तर्फे आवाहन केले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या