गुंतवणुकीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुंतवणूकीच्या नावाखाली महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी प्रसाद जावकर आणि हेमंत रावराणे या दोघांना कुरार पोलिसांनी अटक केली आहेत, तर मुख्य सूत्रधार हा पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

सदर महिला या धर्मदाय आयुक्त कार्यालयातून निवृत्त झाल्या होत्या. त्यांना निवृत्तीनंतर 28 लाख रुपये मिळाले होते. महिलेच्या मुलाला एका गुंतवणूक कंपनीबाबत माहिती मिळाली. ती कंपनी शेअरमध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा देते असे महिलेला सांगितले.

त्यानंतर महिला ही हेमंत, प्रसाद आणि फरार आरोपीला भेटली. त्यांच्यात गुंतवणुकीबाबत एक करार झाला. काही महिने त्यांना चांगला परतावा मिळाला होता, मात्र नंतर पैसे देणे बंद झाले. याप्रकरणी महिलेने कुरार पोलीस ठाण्यात धाव घेतली. परिमंडळ 12 चे पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक सतीश गाढवे यांच्या पथकातील उपनिरीक्षक सतीश वायाळ यांनी तपास सुरू केला. त्या दोघांना अटक केली.