राजाच्या दर्शनाला गेलेल्या स्वराची चप्पल गेली चोरीला

1424

गणेशोत्सवाची धूम अवघ्या मुंबापुरीवर असताना त्यात सगळे सेलिब्रिटीही न्हाऊन निघाल्याचं पाहायला मिळत आहे. पण एरवी सुरक्षा रक्षकांच्या कड्यात वावरणाऱ्या सेलिब्रिटीला दर्शनासाठी उसळलेल्या गर्दीचा चांगलाच फटका पडू शकतो. याचा प्रत्यय अभिनेत्री स्वरा भास्करला आला आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेलेल्या स्वराची कोल्हापुरी चप्पल चोरीला गेली आहे.

swara-chappal

खुद्द स्वरानेच एक व्हिडीओ पोस्ट करून या चोरीची माहिती दिली आहे. स्वरा बुधवारी लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेली होती. तिने लाल रंगाचा पेहराव केला होता. त्यावर मॅचिंग अशा कोल्हापुरी चपलाही तिने घातल्या होत्या. दर्शन आटपल्यानंतर तिच्या कोल्हापुरी चपला हरवल्याचं तिला लक्षात आलं. त्यामुळे ती अनवाणी पायांनीच चालत तिच्या गाडीपर्यंत गेली. वाटेत तिने हा व्हिडीओ बनवला आणि ट्विटरवर शेअर केला.

या व्हिडीओला नेटकऱ्यांनीही तुफान प्रतिसाद दिला आहे. स्वरा असो किंवा सामान्य भक्त, सर्वांनीच कधी ना कधीतरी अशा चप्पल चोरीचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे काहींनी या व्हिडीओला समर्थन दिलं आहे. तर काहींनी यावरूनही स्वराला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या