ललित कांस्यपदकासाठी भिडणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक कुस्तीच्या आखाडय़ात हिंदुस्थानच्या ललितने दमदार खेळ करत कांस्यपदकाच्या लढतीत धडक मारली आहे. ग्रीको-रोमन जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत अमेरिकेच्या मॅक्स एमिलियानो नोक्हरीला 7-0 असे लोळवत ललितने पदकाच्या आशा जिकंत ठेकल्या. मात्र, दुसरीकडे हिंदुस्थानच्या तीन मल्लांना पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळाका लागला. त्यामुळे ललितच्या कामगिरीकडे आता संपूर्ण भारतीय कुस्तीप्रेमींचे लक्ष लागले आहे. ललितची कांस्यपदकासाठी कझाकिस्तानच्या इस्कर कुर्बायेकशी लढत होणार आहे. या लढतीत किजय मिळकल्यास ग्रीको-रोमन प्रकारात जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे पदक जिंकणारा तो दुसरा हिंदुस्थानी मल्ल ठरेल. याआधी संदीप तुलसी यादकने 2013 मध्ये कांस्यपदकाची कमाई केली होती. त्यामुळे ललितसमोर इतिहास घडकण्याची संधी आहे.