पेडणे बोगद्यात दरड कोसळल्याने ‘कोरे’ विस्कळीत, कोकण मार्गावरील गाड्या मीरज-लोंढा मार्गे वळविल्या

341

गेल्या दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने कारवार रिझनच्या मडुरे आणि पेरनेम स्थानकादरम्यान पेडणे बोगद्यात भिंत सरकून दरड कोसळल्याने कोकण रेल्वेचा मार्ग ठप्प झाल्याची घटना गुरूवारी रात्री घडली. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसून कोकण रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी रवाना होत दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, कोकण मार्गावरील गाड्यांना लोंढा-मीरज-पुणे मार्गे वळविण्यात आले आहे.

कोकण मार्गावरील कारवारच्या हद्दीतील पेडणे बोगद्यात गुरूवारी मध्यरात्री 2.50 वाजण्याच्या सुमारास अंदाजे 5 मीटर लांबीची भिंत कलून रूळांवर दरड कोसळली. या घटनेत कोणतीही हानी झाली नसून कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्य़ांनी दुरूस्तीचे काम सुरू केले आहे. रुळावरील माती, दगड हटकून मार्ग सुरू करण्याचे काम युद्धपातळीकर सुरु करण्यात आले आहे. कोकण मार्ग त्यामुळे ठप्प झाला असून या मार्गावरील रेल्वे गाड्यांना लोंढा-मीरज-पुणे मार्गे वळविण्यात आले आहे. एर्नाकुलम-हजरत निजामुद्दिन सुपरफास्ट स्पेशल एक्सप्रेस, तिरुवअनंतपुरम सेंट्रल-एलटीटी एक्सप्रेस, नवी दिल्ली – तिरुवअनंतपुरम सेंट्रल राजधानी स्पेशल, हजरत निजामुद्दिन–एर्नाकुलम सुपरफास्ट, एलटीटी टर्मिनस  तिरुवअनंतपुरम सेंट्रल या रेलगाड्या वळविण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या