तुमच्या प्रेमामुळे लता मंगेशकर बनलेय! लतादीदींनी मानलेले चाहत्यांचे आभार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
लता मंगेशकर (ज्येष्ठ गायिका)

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा मंगळवारी 92 वा वाढदिवस होता. जगभरातील करोडो चाहत्यांनी लतादीदींचे अभीष्टचिंतन केले. लतादीदींनी आज या सर्वांचे आभार मानले. तुमच्या प्रेमामुळेच लता मंगेशकर बनली आहे हे मी कधी विसरणार नाही, अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली.

लता मंगेशकर यांनी आज सोशल मीडियावर दोन मिनिटांची ऑडिओ क्लिप शेअर केली. चाहत्यांशी संवाद साधताना लतादीदी म्हणाल्या, ‘काल माझा वाढदिवस होता. लोकांनी मला भरभरून शुभेच्छा दिल्या. ट्विटर, फेसबुकवरून, दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. लहान मुलांनी फोन केले. मला चित्रं पाठवली. केवळ देशातून नव्हे तर देशाबाहेरून पह्न आले. माझे कर्तव्य होतं की मी तुम्हा सर्वांचे आभार मानावे. तुम्ही मला हे आसन दिलंय. मी तर सिनेमासाठी गायलं होतं. तुम्ही ते एवढं पसंद केलंत, एवढं पसंद केलेत की मला या उंचीवर ठेवलंत. मला मोठं केलंत! मी कधी विसरू शकत नाही की, लोकांनी मला जे प्रेम दिलेय त्यामुळेच लता मंगेशकर बनली आहे. पुन्हा एकदा तुमचे आभार मानते. हे प्रेम असंच राहू दे…तुमचे आशीर्वाद असेच राहू दे… मी नेहमीच तुमची राहीन!. तुम्हाला सदैव आनंद द्यायचा प्रयत्न करेन.’

लता मंगेशकर यांच्या या ऑडिओ क्लिपला त्यांचे चाहते भरभरून लाईक्स आणि कमेंट करत आहेत. लतादीदींचा आवाज ऐकायला मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करत आहेत.