
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान याने गुरुवारी आपला 58 वा वाढदिवस साजरा केला. शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि त्याची एक झलक पाहण्यासाठी बुधवारी मध्यरात्रीपासूनच चाहत्यांची ‘मन्नत’बाहेर गर्दी उसळली. गर्दी एवढी नियंत्रणाबाहेर गेली की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही शाहरुखचा वाढदिवस साजरा करण्यासाठी शेकडो चाहते मन्नतबाहेर जमले होते. चाहत्यांनी केक कापून फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. शाहरुखनेही मन्नतच्या रेलिंगवर चढून ’ सिग्नेचर पोझ’ दिली. त्यानंतर त्याने फ्लाइंग किस देत आणि हात उंचावत चाहत्यांचे आभार मानले.





























































