लातूरमध्ये 4380 जणांची तपासणी, जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही

1537

लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत 1 मार्चला दुपार पर्यंत एकुण 173 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. आजपर्यंत 4380 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असुन आजतागायत एकुण 63 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी रष्ट्रीय विषाणु संस्था, पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी 63 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आलेले आहे. एकही कोरोनाचा रुग्ण आज पर्यंत जिल्ह्यात आढळून आलेला नाही. आजपर्यंत एकुण 14 व्यक्तींचा क्वारंटाईन कालावधी संपला आहे व इतर 47 व्यक्तींना जिल्हा आरोग्य विभागामार्फत होम क्वारंटाईनमध्ये निगराणीखाली ठेवण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. मारुती कराळे कोरोना विलगीकरण कक्ष प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक औषधवैद्यकशास्त्र विभाग यांनी दिली.

प्राथमिक तपासणी नंतर COVID-19 आजारा सारखी लक्षणे आढळल्यास किंवा कोरोना बाधित / संशयित व्यक्तींचा संपर्क झाला असेल तर अशा व्यक्तींना व प्रवाशांना विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातुर येथील कोरोना विलगीकरण कक्षात तपासणीसाठी पाठविण्यात यावे असे आवाहन डॉ. गिरीष ठाकुर  अधिष्ठाता, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातुर यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या