Latur crime news तहसीलदारांचा धमाका, अवैध वाळुउपसा करणाऱ्या दोन बोटी उडवल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

औराद शहाजनी येथील तेरणा नदीच्या पात्रात अवैध मार्गाने वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांना तहसीलदार अनुप पाटील यांनी दणका दिला आहे. अवैध वाळुउपशाची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदारांनी महसूल पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि वाळुउपसा करण्यासाठी लावलेल्या दोन बोटी जीलेटीनद्वारे उडवल्या. शनिवारी सायंकाळी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे वाळुतस्करांचे धाबे दणाणले आहेत.

महसूल विभागाच्या कार्यवाहीत तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली मंडळ अधिकारी मिरजगावकर व तलाठी बालाजी भोसले, लिपीक बोसले, संतोष भोसले, कोतवाल स्वामी यांनीही मदत केली. या धडक कार्यवाहीमुळे महसूल पथकाचे गावकऱ्यांकडून व शेतकऱ्यांच्या वतीने अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.