रूम खाली करण्यावरून झाला वाद, वृद्धाचे कत्तीने फोडले डोके

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उदगीर शहरातील बनशेळकी रोडवरील नासेर फकीर मोहम्मद शेख या वृद्धास रूम खाली करण्याच्या कारणावरून कत्तीने डोक्यात मारून जखमी केले व जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नासेर फकीर मोहम्मद शेख (74) यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, फिरोज नासेर शेख याने फिर्यादीस फोन करून घरी बोलावून घेतले. रूम खाली करण्याच्या कारणावरून शिवीगाळ केली व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कत्तीने डोक्यात मारून डोके फोडले व जिवे मारण्याची धमकी दिली. फिरोज शेख याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी शिरसे हे करत आहेत.