
लातूर जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू करूनही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. 19 जुलै रोजी 534 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेमध्ये आलेले होते. यातील 228 अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. 53 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून उपचारादरम्यान 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. लातूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1159 वर पोहचली असून मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 53 वर गेली आहे.
जिल्ह्यात 19 जुलै रोजी 534 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आलेले होते. त्यामध्ये 228 अहवालाची तपासणी होणे शिल्लक असून झालेल्या तपासणीमध्ये 53 रुग्ण कोरोना संक्रमित असल्याचे आढळून आले आहे. या 53 जणांमध्ये जळकोट रोड उदगीर 1, श्रीकृष्ण नगर लातूर 1, देगलूर रोड उदगीर 1, अहमदपूर 2, हसरणी ता. अहमदपूर 3, शिवाजी नगर औसा 1, गांधी चौक औसा 1, तहसील जवळ औसा 1, लातूर रोड ता. चाकूर 2, नई आबादी उदगीर 1, शेल्हाळ रोड उदगीर 1, हनुमान कट्टा उदगीर 2, विशाल नगर लातूर 2, जुनी कापडलाईन लातूर 1, सुभाष नगर लातूर 1, चिलवंतवाडी ता. निलंगा, मोतीनगर लातूर 1, सुतमिल रोड लातूर 1, कामखेडा ता. लातूर 1, हिप्पळगाव ता. शिरुर अनंतपाळ 1, सिध्दीविनायक नगर लातूर 1, श्री स्वामी समर्थ लातूर 1, मित्र नगर लातूर 1, जुनी कापड लाईन लातूर 2, गुडसूर ता. उदगीर 1, जिएमसी रोड लातूर 2, भातखेडा ता. लातूर 1, थोरलेवाडी ता. अहमदपूर 1, शिरुर ताजबंद ता. अहमदपूर 2, टाकळगाव ता. अहमदपूर 1, अहमदपूर 5, परशुराम कॉलनी लातूर 1, भाग्यनगर 1, बडूर ता. निलंगा 1, साळे गल्ली लातूर 1, ड्रायव्हर कॉलनी लातूर 3, साई रोड लातूर 1, एमआयडीसी लातूर 1 यांचा समावेश आहे.
लातूर जिल्ह्यात 3 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
लातूर जिल्ह्यात उपचारादरम्यान 19 जुलै रोजी 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये खतीब गल्ली निलंगा येथील 65 वर्षाच्या महिलेचा लातूरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत मृत्यू झाला. आयेशा कॉलनी उदगीर येथील 60 वर्षाच्या महिलेचा आणि अशोक नगर उदगीर येथील 52 वर्षाच्या पुरुषाचा उपचारादरम्यान उदगीर येथील सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. लातूर जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 53 वर पोहचली आहे.



























































