
लातूर जिल्ह्यात पुन्हा ४२८ पॉझिटीव्ह रुग्ण वाढलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या यामुळे ९५४३ वर पोहोचलेली आहे. आतापर्यंत ६७१५ रुग्ण उपचाराने बरे होऊन घरी परतलेले आहेत. तर ३०७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.
लातूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या प्रचंड वाढत आहे. आज पुन्हा तब्बल ४२८ पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत. २२६ आरपीसीआर टेस्ट करण्यात आलेल्या होत्या त्यामध्ये ६८ रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आले. १३३९ रॅपीड अॅन्टीजीन टेस्ट करण्यात आलेल्या होत्या त्यामध्ये ३६० रुग्ण कोरोना बाधित आढळून आलेले आहेत. एकूण ४२८ पॉझिटीव्ह रुग्ण वाढलेले असून लातूर जिल्ह्यातील पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या यामुळे ९५४३ वर पोहोचलेली आहे.
लातूर जिल्ह्यात सध्या २५२१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ३०७ रुग्णांचा उपचारादरम्यान आजपर्यंत मृत्यू झालेला आहे. ६७१५ रुग्ण उपचाराने बरे होऊन घरी परतले आहेत.






























































