
दिनांक 23 ऑगस्ट 202 रोजी पोलीस ठाणे चाकूर हद्दीतील मौजे नळेगाव येथील घरात प्रवेश करून घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा 9 लाख 57 हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला होता. 12 तासाच्या आत पोलीसांनी गावातीलच चोरी करणाNया युवकास अटक करून त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले.
सदरील चोरी प्रकरणात मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी गावातीलच उमर मुनवर मुजावर (वय 20 वर्ष, रा. नळेगाव) यास ताब्यात घेतले. त्याने चोरी केल्याची कबुली दिली व चोरलेले सोन्या-चांदीचे दागिने रोख रक्कम असा एकूण 8 लाख रुपयाचा मुद्देमाल काढून दिला आहे. गुन्ह्यातील उर्वरित मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे चाकूरचे पोलीस उपनिरीक्षक आर.व्ही. घाडगे करीत आहेत.
सदर कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर निकेतन कदम, चाकूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते, पोलीस उपनिरीक्षक कपिल घाडगे पाटील, पोलीस अंमलदार योगेश मरपले, हनुमंत मस्के यांनी केली आहे.



























































