
लातूर शहरातील क्वाईल नगर भागातील 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी मुलीच्या आईने फिर्यादीत नमुद केले आहे की, त्यांची मुलगी औसा रोडवरील एका कपड्याच्या दुकानात कामाला होती. सायंकाळी 5 वाजता घरी जाते म्हणून ती दुकानातून निघाली परंतु घरी पोहचलीच नाही. सायंकाळी आईने मुलगी घरी आली नाही म्हणून शोध घेतला असता ती 5 वाजता तिथून गेल्याचे समजले मात्र सर्वत्र तिचा शोध घेऊनही ती सापडली नाही. त्यामुळे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द पळवून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली.































































