
इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या सृष्टी सुधीर जगताप हिने सलग 24 तास लावणी नृत्य सादर करुन ‘आशिया रेकॉर्ड’ मध्ये आपल्या नावाची नोंद केली आहे.
लातूर येथील दयानंद सभागृहात सृष्टी सुधीर जगताप हिने 26 जानेवारी रोजी सलग 24 तास लावणीनृत्य सादर करण्याचा शुभारंभ केला होता. आज सायंकाळी तिने सलग 24 तास लावणीनृत्य सादर करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
सृष्टी ही पोतदार इंग्लीश स्कुलमध्ये इयत्ता नववी मध्ये शिकत आहे. यापूर्वी तिने विविध कार्यक्रमांमधून सुमारे 71 पारितोषिके पटकावलेली आहेत. एकपात्री प्रयोगही तिने सादर केलेले आहेत. यापूर्वी तिने सलग १२ तास नृत्य सादर केलेले होते. मात्र आता सलग 24 तास लावणी सादर करण्याचा विक्रम तिने निर्माण केला आहे.

या दरम्यान दर दोन तासांनी तिला वैद्यकीय पथक तपासणी करीत होते. दर तासाला तीन मिनीटे तिला थांबण्याची परवानगी देण्यात आलेली होती. सृष्टीचे आई-वडील हे दोघेही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत. या यशाबद्दल लातूर जिल्ह्यात सृष्टीचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

































































