
औसा तालुक्यातील शिवली मोड जवळील बोरफळ तांड्याजवळ ऊस आणण्यासाठी निघालेला ट्रक वरील ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने ट्रक पलटी झाल्याने एकाचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, 29 डिसेंबर रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी महेश गणपती स्वामी (वय 23) यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवली मोड जवळील बोरफळ तांड्याजवळ आपल्या ताब्यातील वाहन क्रमांक एम एच २४ इ ५३५६ याचा चालक विवेकानंद बसवराज स्वामी (वय 43) हे नागरसोगा येथे ऊस भरण्यासाठी जात असताना आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे व हायगयीपणाने ट्रक चालवून पलटी होऊन त्याखाली स्वतः ट्रक चालक अडकल्याने त्याचा मृत्यू झाला. तर सोबत असणारे सतीश उत्तम आडे (वय 15)हा गंभीर जखमी झाल्याने त्यास शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
































































