
सामना प्रतिनिधी । लातूर
अहमदपूर तालूक्यातील शिरुर ताजबंद येथे मंगळवारी रात्री भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने स्कूटीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात स्कूटीचालकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघाता प्रकरणी आनंद त्र्यंबक आकनगीरे रा.सय्यदपूर खुर्द याने तक्रार दाखल केली. रामकिशन गोविंदराव नलाबले (46) हे अहमदपूर येथील आयटीआय जवळ राहात होते. 28 मे रोजी रात्री सय्यदपूर खुर्द येथील शेतीचे काम आटोपून ते अहमदूपर येथे जात असताना शिरुर ते अहमदपूर रस्त्यावरील भोसले यांच्या शेताजवळ रात्री 8.40 वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने स्कुटीला जोराची धडक दिली. या अपघातामध्ये रामकिशन नलाबले यांचा मृत्यू झाला. 29 मे रोजी या प्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनाविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

































































