लातूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी सायंकाळी अवकाळी पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सायंकाळी अवकाळी पावसाचे आगमन झाले. सकाळ पासूनच सर्वत्र ढगाळ वातावरण होते. हटकरवाडी येथे वीज पडून म्हैस दगावली.

लातूर जिल्ह्यात गुरुवारपासूनच ढगाळ वातावरण होते. शुक्रवारी दिवसभर पावसाचे वातावरण होते. सायंकाळी लातूर शहरात तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या. रेणापूर तालुक्यात सायंकाळी काही भागात जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

चाकूर तालुक्यातील हटकरवाडी येथे वीज पडून म्हैस दगावली. शिवाजी रानबा भोसले यांच्या शेतात बाभळीच्या झाडाखाली बांधलेली म्हैस वीज पडून दगावली. जानवळ येथेही मध्यम स्वरूपात पडला.

उदगीर परिसरामध्ये विजांच्या गडगडात सह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसात सुरुवात झाली . जळकोट शहर व तालुक्यात आज मोठा पाऊस पडला आहे. काल रात्रीच्या पावसामुळे वीज पुरवठा खंडित आहे. देवणी तालूक्यात तुरळक पाऊस झाला . औसा शहर व परिसरात हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. तर तालुक्यातील भादा परिसरात जोरदार पाऊस झाला. चाकूर परिसरात हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. वाढवता बु, हडोळती परिसरात ही तुरळक प्रमाणात पाऊस झाला.