लातूर जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्षांची बिनविरोध निवड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्पष्ट बहुमत असलेल्या लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपाचे राहूल केंद्रे यांची तर उपाध्यक्षपदी भाजपाच्या भारतबाई सोळंके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. लातूर महानगर पालिकेची सत्ता गमवावी लागल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांसह इतरांनी खबरदारी घेतली होती.

लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. लातूर शहर महानगर पालिकेत भाजपाचे बहुमत असताना महापौरपद काँग्रेसने खेचून घेतले होते. भाजपामध्ये बंडखोरी झालेली होती. त्या पाश्र्वभूमीवर यावेळी जिल्हा परिषदेच्या निवडीवेळी पक्षाने चांगलीच खबरदारी घेतली होती. स्पष्ट बहुमत असल्याने काँग्रेसच्या उमेदवारी दाखल केलेले अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी अर्ज काढून घेतले आणि भाजपाचे राहूल केंद्रे अध्यक्ष तर भारतबाई साळुंके या उपाध्यक्ष म्हणून निवडल्या गेल्या. पिठासीन अधिकारी म्हणून उप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी काम पाहिले.

अमरावती जि.प.वर महाविकास आघाडीचा झेंडा; काँग्रेसचा अध्यक्ष, शिवसेनेचा उपाध्यक्ष