
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय गुन्ह्याची जबाबदारी स्वीकारली आहे. रविवारी (५ ऑक्टोबर) उशिरा कॅनडामध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या. लॉरेन्स टोळीने सोशल मीडियाद्वारे जबाबदारी स्वीकारली. टोळीने सोशल मीडियावर गोळीबाराचे कारण स्पष्ट करणारी एक पोस्ट शेअर केली.
लॉरेन्स टोळीशी संबंधित फतेह पोर्तुगालने सोशल मीडिया पोस्ट शेअर केली ज्यामध्ये दावा केला आहे की, नवी टेसी नावाच्या व्यक्तीने लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने लोकांकडून ५० लाख रुपये उकळले होते. म्हणूनच त्याच्या लपण्याच्या ठिकाणांवर गोळीबार करण्यात आला. बिश्नोई टोळीला नुकतेच कॅनडाने दहशतवादी संघटना घोषित केले आहे.
बिश्नोई टोळीच्या नावाने काहीजण खंडणी वसूल करत आहेत. तसेच लोकांना धमकावत आहेत, म्हणूनच कॅनडात गोळीबार झाला. लॉरेन्स टोळीचा सदस्य फतेह पोर्तुगालने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, “सत श्री अकाल, सर्व बांधवांना राम राम. मी फतेह पोर्तुगाल आहे. पोस्टमध्ये लिहिले आहे की, “कष्टाळू जनतेशी आमचे कोणतेही वैर नाही. कठोर परिश्रम करून उदरनिर्वाह करणाऱ्यांशी आमचे कोणतेही भांडण नाही. आता कोणी खोट्या बातम्या पसरवल्या तर व्यावसायिकांच्या जीवितहानी किंवा व्यवसायाच्या नुकसानाची जबाबदारी तुमची असेल, आमची नाही. आमच्या पद्धती चुकीच्या वाटू शकतात, परंतु आमचे हेतू चुकीचे नाहीत.” कॅनडाच्या सरकारने आधीच अधिकृतपणे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीला दहशतवादी संघटना घोषित केले होते.