अशा प्रकारे तयार करा शिळ्या भाताचा पौष्टीक नाश्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरात अनेकदा शिळा भात उरतो तो एकतर तसाच खाल्ला जातो किंवा फारतर त्याचा फोडणीचा भात केला जातो. हाच शिळा भात वापरून एक असा पदार्थ केला जाऊ शकतो जो होतोही झटपट आणि खायलाही असतो चवीचा.

साहित्य – शिळा भात, तूप, तांदळाचे पीठ, पाणी, मीठ, जीरं, कडिपत्ता, राई, पांढरे तीळ

कृती – उरलेला शिळा भात परातीत काढून त्यात मळण्यासाठी लागेल इतके तांदळाचे पीठ व पाणी घालून चपातीसारखा पीठाचा गोळा तयार करून घ्यावा. त्या पीठाच्या छोट्या छोट्या मुठीया तयार करून घ्याव्या. टोपात पाणी गरम करावे व त्यात मीठ व तेल टाकावे. त्यात मुठिया टाकून ते उकळून घ्यावे. मुठिया व्यवस्थित शिजल्या की एका ताटात काढून फॅनखाली सुकवून घ्याव्या. त्यानंतर तूपावर जीरं, कडिपत्ता, राई, पांढरे तीळ यांची फोडणी करावी व त्यात मुठिया परतून घ्याव्या. अशा प्रकारे सकाळी झटपट होणारा पौष्टीक नाश्ता तयार…