लियो कार्टर एका षटकात सहा षटकार ठोकणारा जगातला सातवा फलंदात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

न्यूझीलंडचा राष्ट्रीय क्रिकेटपटू लियो कार्टर याने स्थानिक टी-20 क्रिकेट स्पर्धेत नॉर्दर्न नाइटस्चा स्पिनर एंटन डेवसिच याच्या गोलंदाजीवर 16 व्या षटकांत सहा षटकार ठोकण्याचा विक्रम केला. क्रिकेटमध्ये असा विक्रम नोंदवणारा कार्टर हा जगातील सातवा फलंदाज ठरला आहे. लियोने कॅटरबरी संघाकडून खेळताना हा पराक्रम साकारला.

कार्टरच्या आधी क्रिकेटमध्ये असा पराक्रम जगातील सहा फलंदाजांनी नोंदवला आहे. त्यात रवी शास्त्राr, युवराज सिंग यांच्याव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेचा हर्शेल गिब्ज, वेस्ट इंडीजचे सर गॅरी सोबर्स, इंग्लंडचा रॉस विटिली आणि अफगाणिस्तानचा हजरतुल्ला जजई या फलंदाजांचा समावेश आहे. हिंदुस्थानचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग याने 2007 सालच्या टी-20 विश्वचषकात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याचे चेंडू षटकात सहावेळा सीमारेषेबाहेर भिरकावत विक्रम रचला होता.

cdc