
शिकारीच्या शोधात असलेल्या बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत सावजाचाही मृत्यू झाला आणि शिकाऱ्याचाही. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात घडली आहे. शुक्रवारी रात्री या दोघांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे. शनिवारी सकाळी ही बाब गावकऱ्यांच्या निदर्शनास आली होती.
भेंडाळा (खातगाव)मधल्या डीपीवर एक माकड चढले होते. डीपीचा शॉक बसल्याने या माकडाचा मृत्यू झाला होता. शिकारीच्या शोधात असलेल्या बिबट्याला हे माकड दिसले होते. त्याची शिकार करण्याच्या नादात बिबट्या हा डीपीवर चढला होता. यामुळे त्याचाही शॉक लागून मृत्यू झाला.


























































