कमी दारू प्याल तरी मराल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

कमी दारू प्यायल्याने काही होत नाही, कमी दारू प्यायल्याने शरीराला फायदेच होतात असे अनेक दावे मद्यप्रेमींकडून केले जातात मात्र दारू कमी प्या किंवा जास्त प्या मृत्यू होण्याची शक्यता आहेच, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. या अभ्यासानुसार दारू कमी प्यायल्याने देखील पिणाऱ्याला हृदयविकार, टीबी, मधुमेह, कर्करोगासारखे आजार होण्याची शक्यता असते व त्यामुळे त्यांचा मृत्यू होऊ शकतो.

तुम्ही दारू पिता, ही बातमी नक्की वाचा

अभ्यासकांनी १९९० ते २०१६ च्या दरम्यान १९५ देशांतील मृत्युसंदर्भात केलेल्या सर्वेक्षणातून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालात कमी दारू प्यायल्याने देखील लोकांचे मृत्यू होत असल्याचे म्हटले आहे. ‘दे लॅसंट’ या रिसर्च मासिकात प्रकाशित झालेल्या सर्वेक्षणानुसार जगभरात दरवर्षाला दारू प्यायल्याने ७ टक्के पुरुषांचा तर २ टक्के महिलांचा दारु प्यायल्याने मृत्यू होतो. २०१६ मध्ये जगभरातील १५ ते ४९ वयोगटातील पुरुष महिलांच्या मृत्यूमागे दारूचे सेवन हे कारण आहे.

गणेशोत्सवात दारू प्यायल्यास ११ दिवस पोलीस कोठडी!

 ‘दारू कमी प्यायल्याने देखील मृत्यू होण्याची शक्यता आहे. दारू प्यायल्याने माणसाच्या शरीरावर अनेक वाईट परिणाम होत असतात. दिवसाला दोन पेग ड्रिंक्स घेणाऱ्यांचा मृत्यू होणाचे प्रमाण देखील जास्त असल्याचे या अभ्यासात समोर आले आहे. दारूमुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या संख्येत १० टक्के लोकं ही कमी दारू पिणारी आहेत’, अशी माहिती अभ्यासक मॅक्स ग्रिसवूल्ड यांनी दिली.