
अमेरिकेत राहणाऱ्या एका व्यक्तिच्या आयुष्याला त्याच्या पत्नीमुळे कलाटणी मिळाली. एक दिवस त्याने त्याच्या पत्नीची पर्स उघडली आणि त्यामध्ये त्याला अशा काही वस्तू सापडल्या की, तो चक्क करोडपती बनला, असे तो सांगतो.
द मिररमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील कैरोलिना येथे राहणाऱ्या या व्यक्तिचे नाव टेरी पीस (65) असे आहे. त्यांनी पॉवरबॉल 160 रुपयांचे लॉटरीचे तिकिट विकत घेतले होते, पण घरी आल्यानंतर ते तिकिट काढल्याचे विसरतात. हे तिकिट हरवल्याचे लक्षात आल्यावर टेरी पीस तिकिट शोधण्याचा खूप प्रयत्न करतात, पण तरीही त्यांना तिकीट सापडत नव्हते. तिकिट शोधत असताना ते पत्नीची पर्स उघडतात. तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. ते शोधत असलेले लॉटरीचे तिकिट पत्नीच्या पर्समध्ये ठेवल्यानंतर टेरी विसरून जातात. पती-पत्नी दोघांनाही तिकिट कुठे ठेवलेय, हे आठवतही नाही. तिकीट सापडल्यानंतर, मात्र दोघा पती-पत्नींना आश्चर्याचा धक्का बसला, कारण त्यांनी 8 कोटी रुपये जिंकले होते.
लॉटरीचे तिकिट जिंकल्यानंतर मात्र या उभयतांचे आयुष्यच बदलले. बक्षीस जिंकल्यानंतर टेरी म्हणाले, हा प्रसंग आमचे आयुष्य बदलवणारा आहे. आम्ही भाग्यवान आहोत. सुदैवाने पत्नीच्या पर्समध्ये तिकीट सापडले. माझा माझ्या नशिबावर विश्वास होता. किती आनंद झालाय, हे शब्दात व्यक्त करू शकत नाही. गेल्या आठवड्यात कर कपात केल्यानंतर टेरीला 5 कोटी 78 रुपये मिळाले. आता या पैशातून आधी घराचे नूतनीकरण करण्याचा विचार करत आहे. जोडप्याला त्यांच्या नातवंडांसाठी काही पैसे वाचवायचे आहेत. टेरी ट्रक खरेदी करण्याचा विचार करत आहे. पत्नीमुळे माझं आयुष्यच बदललं.
























































