गणपतीपुळ्यात बुडणाऱ्या दोघांना जीवरक्षकांनी वाचवले

अंगारकी संकष्टीनिमित्त सांगलीहून गणपतीपुळ्यात आलेले दोनजण समुद्रात पोहायला गेले असताना गंटागळ्या खाऊ लागले. पाण्याच्या प्रवाहामुळे बुडत असल्याचे समजताच त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यावेळी जीवरक्षकांनी समुद्रात उड्या घेत त्या दोघांना वाचवले आहे. अंगारकी संकष्टी निमित्ताने गणपतीपुळ्यात मंगळवारी जत्रा भरली होती. मोठ्या संख्येने भाविक मंदिरात आले होते. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावरही गर्दी झाली होती. त्याचवेळी सकाळी 7 वाजता सांगलीहून आलेले वैभव दिलीप चव्हाण (वय 23) आणि संतोष गंगाराम चव्हाण (वय 26) हे बुडत होते. या दोघांना रोहित चव्हाण, विक्रम राजवाडकर, मयुरेश देवरुखकर, अनिकेत राजवाडकर, अनिकेत चव्हाण, निखिल सुर्वे, अक्षय माने, आशिष माने, उमेश म्हादये, विशाल निंबरे, ओंकार गावणकर या जीवरक्षकांनी वाचवले.

आपली प्रतिक्रिया द्या