
मालाडमधील आक्सा चौपाटीवर बुडणाऱ्या 10 जणांना मुंबई महापालिकेने नेमलेल्या लाईफ गार्डस्नी वाचवले. रविवारी रात्री 19 जण आक्सामधील चौपाटीवर पोहण्यासाठी उतरले होते, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते बुडाले. त्यातील 9 जण पाण्यातून बाहेर पडून सुरक्षितपणे चौपाटीवर आले. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला असता प्रसंगावधान राखत लाईफ गार्डस्नी 10 जणांना सुरक्षितपणे चौपाटीवर आणले. दरम्यान, कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.


























































