Skin Care- त्वचा तरुण ठेवण्याचा स्वस्त आणि मस्त फंडा, वाचा सविस्तर

आपल्याकडे सध्याच्या घडीला आईस फेशियलचा ट्रेंड फार जोर धरु लागलेला आहे. चेहऱ्यावर बर्फ लावल्याने, आपल्या त्वचेला फार फायदे मिळू लागले आहेत. खासकरुन आईस फेशियल सध्याच्या घडीला अनेकांच्या रुटीनचा एक भाग झालेला आहे. आईस फेशियलचे चेहऱ्याच्या त्वचेसाठी अनेक फायदे होतात. त्वचा डिटाॅक्स करण्यासाठी आईस फेशियल हा रामबाण उपाय मानला गेलेला आहे.

आईस फेशियलमुळे चेहऱ्यावर एक अनोखी चमक येते. मुख्य म्हणजे आईस फेशियलमुळे त्वचेमध्ये ऑक्सिजनसह इतर पोषक तत्वांचे प्रमाणही फार वाढते.

 

Skin Care – आंघोळीपूर्वी फक्त या 5 गोष्टी करा, तुमचा चेहरा ब्राइडल फेशियल केल्यासारखा चमकेल!

आईस फेशियलमुळे त्वचा तरुण होण्यास मदत होते. तसेच आईस फेशियलच्या वापरामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेलही काढून टाकण्यास मदत होते. चेहऱ्यावर बर्फ लावण्याचा सर्वात तात्काळ परिणाम म्हणजे तो त्वरित चमक देतो. थंड तापमान रक्ताभिसरण वाढवते, त्वचेच्या पृष्ठभागावर ऑक्सिजन आणि पोषक तत्वे पोहोचवते. या वाढीव रक्त प्रवाहामुळे तुमचा चेहरा तेजस्वी चमक देतो, ज्यामुळे तो अधिक ताजा आणि निरोगी दिसतो.

शरीर आतून डिटॉक्स करता येते तेसेच त्वचा ही डिटॉक्स करता येते. आईस फेशियलने त्वचा डिटॉक्स होते. तसेच आइस फेशियलमुळे चेहऱ्यावरील सूजही फार मोठ्या प्रमाणात कमी होते. या फेशियलमुळे चेहऱ्यावरील रक्ताभिसरण सुधारते आणि चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स आणि ब्लॅकहेड्स नाहीसे होण्यास मदत होते.

लग्न किंवा पार्टीला जाणार असाल तर, आईस फेशियल हा एक उत्तम पर्याय मानला गेलेला आहे.

आईस फेशियल करण्याची योग्य पद्धत

एका मोठ्या भांड्यात पाण्यात बर्फ काढून घ्या आणि त्यात तुमचा चेहरा बुडवा.

20-30 सेकंदांनी तुमचा चेहरा बाहेर काढा.

जर तुम्हाला तुमचा चेहरा पाण्यात बुडवायचा नसेल, तर 2-3 बर्फाचे तुकडे सुती कापडात गुंडाळा आणि ते तुमच्या चेहऱ्यावर लावा.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)