
चिंचेच नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. महिलांना चिचं फार आवडते. अनेकदा स्वयंपाकात आबंटपणासाठी चिंचेचा वापर केला जातो. मात्र चिंच अतिप्रमाणात खाल्ल्यास त्याचे दुष्परिणामही होऊ शकतात. कोणत्या लोकांनी चिंच खाऊ नये ते जाणून घेऊया
ज्यांना दातदुखीचा त्रास आहे. त्यांनी चिंच खाणे शक्यतो टाळावे. चिंच खाल्ल्याने दात खराब होतात. तसेच दातांच्या हिरड्यांना नुकसान होऊ शकते. याशिवाय दातांचा इनॅमल खराब होऊ शकतो. होय, दातांच्या इनॅमलमधील आम्ल घटकामुळे दात किडण्याची शक्यता असू शकते.
अनेकांना चिंच खायला आवडते पण चिंच खाल्ल्याने अनेकांना अॅलर्जीचा त्रास होऊ शकतो. चिंच खाल्ल्यानंतर खाज, सूजणे, उलट्या होणे यासारखे त्रास होऊ शकतात.
चिंच ही आंबट असल्याने अॅसिडीटीचा त्रास होऊ शकतो. चिंचेमध्ये टॅनिन आणि त्यात असलेल्या अन्य घटकांमुळे पचनाचा त्रास होऊ शकतो. चिंच खाल्ल्यावर अॅसिडीटी वाढू शकते. पोट फुगल्यासारखे होते. त्यामुळे चिंच जास्त खाऊ नये.
चिंचेच्या अतिसेवनाने रक्तातील साखर कमी होऊ शकते आणि रुग्ण जर आधीपासूनच औषध घेत याशिवाय गरोदर आणि स्तनदा महिलांनाही चिंच खाण्यास मनाई आहे कारण चिंचेच्या नावाचा समावेश गरम अन्नात होतो, ज्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते, ज्यामुळे गर्भाला हानी पोहोचते.




























































