लातूरातील लक्ष्मीनृसिंह मंदिर लक्ष दिव्यांनी उजळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

लातूर येथील उत्तराधीमठातील लक्ष्मीनृसिंह मंदिर आज लक्ष दिव्यांनी उजळले. उत्तराधिमठाचे रघुत्तमाचार्य जोशी यांच्या नियोजनाखाली या लक्ष दिप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी मध्व मंडळाचे पदाधिकारी, गावातील ब्रम्हवृंद, महिला, यांनी परिश्रम घेतले. हा दिप सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी झालेली होती.