
रायगड जिह्यातील सह्याद्रीच्या रांगेत उभा असलेला लिंगाणा सुळका म्हणजे गिर्यारोहकांसाठी आव्हान असते. 3100 फूट उंचीचा लिंगाणा सर करताना अनेकांची दमछाक होते. साधारणतः गिर्यारोहकांना जवळपास 2 तासांहून जास्त वेळ लागतो. तानाजी मोतीराम केकरे या 25 वर्षांच्या युवकाने मात्र काही दिवसांपूर्वी थक्क करणारी कामगिरी केली. अवघ्या 11 मिनिटांत त्याने वाऱयाच्या वेगाने लिंगाणाचे शिखर गाठले आहे.
तानाजी केकरे नाशिक जिह्यातील मु. आंबेवाडी, पोस्ट खडकेंद, तालुका इगतपुरी येथे राहतो. तानाजी महाराष्ट्र रेंजर्सचा गिर्यारोहक आहे. सामान्य कुटुंबातील तानाजीचे आईवडील शेती करतात. तानाजीला लहानपणापासून ट्रेकिंगची आवड आहे. तो ट्रेकर्सला गाईड करतो. याआधी त्याने वजीर, वानरलिगी, तैल-बैल असे बरेच सुळके आणि गडकिल्ले सहज पार केले आहेत.
- मानसी पिंगळे, म. ल. डहाणूकर कॉलेज
लिंगाणा हा रायगड किल्ल्याचा उपदुर्ग आहे. कठीण चढाईचा सुळका आहे. शिवलिंगासारखा आकाशात उंच असा हा सुळका असून त्याची वाट पूर्णतः निसरडी आहे. दोराच्या सहाय्याने चढावे लागते. काही ठिकाणी सरळ कातळ चढावा लागतो.
आपल्या भावना व्यक्त करताना तानाजी म्हणाला, लिंगाणा हा सुळका चढताना आनंद वाटत होता. जसा सुळक्याचा शेवट झाला, शिवभक्त असल्याने शिवरायांच्या चरणी नतमस्तक झालो की काय असे वाटले. यानंतर हरिश्चंद्र गड सर करायचा असल्याचे त्याने सांगितले.




























































