बार्सिलोनाचा मेस्सीसोबत पाच वर्षांचा करार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्पेनमधील क्लब बार्सिलोनाने दिग्गज फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीसोबत पाच वर्षांचा करार केल्याची माहिती मीडियामधून समोर आली आहे. लियोनेल मेस्सी व बार्सिलोना यांच्यामधील करार मागील महिन्यात संपुष्टात आला होता. त्यामुळे दोघांमधील 21 वर्षांचे असोसिएशन संपुष्टात आल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. आता नव्या करारानुसार लियोनेल मेस्सीच्या मानधनात कपात करण्यात येणार आहे. कोरोनामुळे स्पॅनीश फुटबॉल क्लबला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.