दारूला पैसे दिले नाही मारहाण, चौघांना अटक

557
fight
file photo

दारू पिण्यास पैसे दिले नाही या कारणावरून एका व्यक्तीला चार जणांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना कोपरगाव शहरात घडली आहे. याप्रकरणी चार जणांविरुद्ध कोपरगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील तीन जणांना पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असताना शुक्रवारी रात्री शस्त्रांसह अटक केली आहे.

 रामेश्वर रमेश सोनवणे (25) याला 12 च्या सुमारास हॉटेल अंबिका समोर ऋषिकेश सोमनाथ सावंत, अविनाश अशोक भोपळे, मयूर संजय सुपेकर, सनी जयराम पंडोरे या चौघांनी दारू पिण्यास पैसे दिले नाही या कारणावरून शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी फिर्यादीने शनिवारी कोपरगाव शहर पोलिसात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. सदर फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलिसांनी चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे यातील तीन आरोपींना कोपरगाव शहर पोलिसांनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास दरोड्याच्या तयारीत असताना येवला नाका येथे अटक केली होती. चारही आरोपी सध्या कोपरगाव सब जेलमध्ये आहेत. कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार शैलेंद्र ससाने हे तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या