
पुणे शहरात ताडीविक्रीद्वारे मद्यपीवर विषप्रयोग करणाऱ्या टोळीविरूद्ध पहिल्यांदाच मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे टोळीचे धाबे दणाणले आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मोक्का कारवाईमुळे पुन्हा एकदा नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे. सुनिल गंगाराम बनसोडे (वय 20, रा. सोरतापवाडी ता.हवेली) शहारुख युसुफ मनसुरी (वय 25, रा इंदिरानगर), प्रल्हाद ऊर्फ परेश रंगनाथ भंडारी (रा. मुंढवा) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
आरोपी सुनिल बनसोडे हा 265 लिटर रासायनीक विषारी ताडी बनविण्यासाठी बाळगताना मिळुन आला. त्याला ताडीचा माल पुरविण्यात शाहरूख मन्सुरी प्रल्हाद भंडारी, निलेश बांगर हे ताडी बनवीण्याचे रसायन पुरवीत असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यांविरूद्ध लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपी निलेश बांगर हा रासायनिक ताडी बनविण्यासाठी मानवी शरीरावर घातक परिणाम करणारे रासायनिक पदार्थ क्लोरलहाईड्रेट, सॅक्रीन, मड्डी पावडर, यीस्ट होलसेल भावात खरेदी करुन त्याची पुणे शहरामध्ये ताडी विक्री करत होता. त्याशिवाय टोळी प्रमुख प्रल्हाद ऊर्फ परंश रंगनाथ भंडारी याच्याविरुद्ध रासायनिक ताडीचे साहित्य पुरविण्याप्रकरणी 10 गुन्हे दाखल आहेत. त्याशिवाय आरोपी टोळी प्रमुख प्रल्हाद ऊर्फ परंश रंगनाथ भंडारी, सुनिल बनसोडे आणि शहारुख मनसुरी, हे सध्या न्यायालयीन कोठडीत येरवडा मध्यवर्ती कारागृहात न्यायबंदी आहेत.
आर्थिक फायदयासाठी टोळीने लोकांच्या शरीरावर होणाऱ्या घातक परिणामांकडे दुर्लक्ष करुन रासायनिक बनावटीची ताडी तयार करुन विक्री केल्याचे उघडकीस आले होते. टोळीविरूद्ध लोणी काळभोर व हडपसर पोलीस ठाणे आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातंर्गत 10 गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त डॉ.रविंद्र शिसवे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, देशपांडे, बोमादंडी, मयुर सुर्यवंशी, जाचक, साहिल शेख, चेतन गायकवाड, संदिप शेळके, महेश साळुके खेवलकर, नितीन जगदाळे, अजिम शेख, युवराज कांबळे, योगेश मांढरे व दिनेश बास्टेवाड यांनी केली.
रासायनिक पदार्थांचा वापर करून विषारी ताडीविक्री बनवून नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालण्याऱ्या टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. संबंधित टोळीविरूद्ध ग्रामीण आणि शहरात 10 गुन्हे दाखल आहेत.
अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर

























































