
सामना ऑनलाईन । गांधीनगर
- जनताही या पोटदुखीवर चांगला इलाज करू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
- आपण येथे आल्याने काही लोकांच्या पोटात दुखत आहे. या पोटदुखीचा इलाज आमच्याकडे आहे.
- अमित शहा यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण येथे आल्याचे त्यांनी सांगितले.
- आमचे विचार, नेता आणि एकच ध्येय आहे. विरोधी पक्षांचा नेता कोण आहे.
- शिवसेना आणि भाजपची विचारधारा एकच आहे. आमचे विचार आणि हृदय जुळले आहे.
- विरोधी पक्षांचे विचार जुळत नसले तरी ते एकत्र आले आहेत.
- दोन्ही पक्षाची हिंदुत्त्वाची एकच भूमिका असून आता आम्ही एकत्र आलो आहोत.
- अमित शहा आपल्याला भेटायला आले. आमच्यात चर्चा झाली आणि दोन्ही पक्षातील मतभेद दूर झाले.
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात.
- शहा यांनी देशभरात पक्ष मजबूतीने उभा केला आहे. त्यांनी केलेल्या कामामुळे मताधिक्याने विजयी होतील.
- रालोआ सरकार पुन्हा सत्तेत येऊन देशाचा विकास करणार आहे.
- जगातील सर्वात मोठा पक्ष बनवण्याचे श्रेय अमितश शहा यांचे आहे.
- 50 वर्षात जे काम झाले नाही, ते नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पाच वर्षात केले आहे.
- केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या भाषणाला सुरुवात
- पंतप्रधान आणि भाजप अध्यक्ष गुजरातचे असल्याने येथील जनता भाग्यशाली आहे.
- अमित शहा जनतेशी जोडलेले नेते आहे. ते गांधीनगरचा विकास करतील.
- अकाली दलाचे प्रमुख प्रकाशसिंह बादल यांच्या भाषणाला सुरुवात
- अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचा विकास करतील असा विश्वास केला व्यक्त
- गांधीनगरमधील जनता शहा यांनी मताधिक्याने विजयी करेल असा विश्वास रुपानी यांच्याकडून व्यक्त
- गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या संबोधलनाला सुरुवात
- अमित शहा यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून केले अभिवादन
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गांधीनगरमध्ये दाखल
- ठिकठिकाणी पोस्टर्स लावून त्यांचे स्वागत
Gujarat: Visuals from Ahmedabad where preparations are underway ahead of the filing of nominations by BJP President Amit Shah. He is contesting #LokSabhaElections2019 from Gandhinagar parliamentary constituency. pic.twitter.com/TJjQ18lAJR
— ANI (@ANI) March 30, 2019
- अमित शहा यांच्या सभेच्या ठिकाणी जनेतेचा उत्साह
- घाटलोडियाच्या पाटीदार चौकात रोड शोची सांगता होणार
- अहमदाबादच्या सरदार पटेल प्रतिमेपासून चार किलोमीटरचा रोड शो शुरू होणार
- गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्याऐवजी अमित शाह रिंगणात उतरले आहेत.
- आडवणी 1998 पासून या मतदारसंघाचे नेतृत्व करत होते.

























































